पाच हजार लोकसले जेवण देनं
1 त्यानंतर, येशु गालील समुद्रना, म्हणजे तिबिर्य समुद्रना पलीकडे गया. 2 तवय बराच लोकसनी गर्दी त्यानामांगे चालनी, कारण त्या चमत्कारसले दखेत ज्या येशु आजारी लोकसवर करे. 3 येशु डोंगरवर जाईन तठे आपला शिष्यससंगे बसना. 4 यहूदी लोकसना वल्हांडण सण जोडे येल व्हता. 5 तवय येशुनी नजर वर करीसन अनं लोकसनी गर्दी आपलाकडे ई राहीना अस दखीन फिलीप्पले सांगं, "यासले खावाले भाकरी आपण कोठेन ईकत आणान्या?" 6 त्यानी हाई तर फिलीप्पनी परिक्षा दखाकरता सांगं; तो काय कराव शे, हाई त्याले माहीत व्हतं.
7 फिलीप्पनी उत्तर दिधं, "यासनामातीन प्रत्येकनी थोडं थोडं लिधं तरी दोनशे चांदिना शिक्कासना६:७ दोनशे चांदीना शिक्का तवय आठ महिनानी कमाई व्हती, जवळपास चाळीस हजार रूपया ईकत लेयल भाकरी पुरावत नही."
8 त्याना शिष्यसमातील एकजण, म्हणजे शिमोन पेत्रना भाऊ अंद्रियानी त्याले सांगं, 9 "आठे एक पोऱ्या शे त्यानाजोडे पाच भाकरी अनं दोन मासा शेतस; पण त्या ईतलासले कशा पुरतीन."
10 येशु बोलना, "लोकसले बसाडा." तठे बरच गवत व्हतं; तठे बसनारा माणसनी संख्या जवळपास पाच हजार व्हती. 11 येशुनी त्या भाकरी लिध्यात, अनी देवना उपकार मानीन बठेलसले वाटी दिध्यात. तसच त्या मासामातीन बी त्यासले पाहिजे तितक दिधं. 12 त्या तृप्त व्हवानंतर, त्यानी आपला शिष्यसले सांगं, "काही बी वाया जावाले नको; म्हणीन उरेल तुकडा गोया करा." 13 मंग जेवणारासनं पुरं व्हवानंतर पाच भाकरीसपैकी उरेल तुकडा त्यासनी गोया कऱ्यात त्या तुकडासना बारा टोपल्या भरण्यात. 14 त्यानी करेल चमत्कार दखीन त्या लोकसनी सांगं, "जगमा येणारा जो संदेष्टा तो खरोखर हाऊच शे!"