19 मंग शिष्य पाच ते सहा किलोमीटर वल्हावा मारत मारत गयात तवय त्यासनी येशुले पाणीवरतीन चालत नावकडे येतांना दखं, अनी त्यासले भिती वाटनी. 20 पण येशु त्यासले बोलना, "भिऊ नका, मी शे!" 21 यामुये त्याले नावमा लेवानी त्यासनी ईच्छा व्हयनी, अनी ईतलामा त्यासले जठे जावानं व्हतं त्या ठिकाणना किनारावर नाव पोहचनी.