32 यावर येशुनी त्यासले सांगं, "मी तुमले खरंखरं सांगस, मोशेनी तुमले स्वर्गमातीन येणारी भाकर दिधी अस नही, मना बाप तर स्वर्गमातीन येणारी खरी भाकर तुमले देस. 33 कारण जी स्वर्गमातीन उतरस अनं जगले जिवन देस ती देवनी भाकर शे."
34 त्या त्याले बोलनात, "प्रभुजी, हाई भाकर आमले कायम देत ऱ्हाय." 35 येशु त्यासले बोलना, "जिवननी भाकर मीच शे, जो मनाकडे येस त्याले भूक लागाव नही; अनी जो मनावर ईश्वास ठेवस त्याले कधीच तहान लागाव नही.