39 अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानी ईच्छा हाईच शे की, त्यानी जे सर्व माले देयल शे त्यामातीन मी काहीच दवाडाले नको, पण शेवटला दिनसमा मी त्यासले जिवत करीसन ऊठाडाले पाहिजे. 40 मना बापनी हाईच ईच्छा शे की, जो कोणी पोऱ्याले दखीन ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हवाले पाहिजे, त्याले शेवटला दिन मी ऊठाडसु."