44 जोपावत ज्यानी माले धाडेल शे तो बाप आपलाकडे ओढी लेस नही तोपावत मनाजोडे कोणीच येवु शकस नही अनी शेवटला दिनले मी त्याले जिवत करीसन ऊठाडसु. 45 संदेष्टासना ग्रंथमा अस लिखेल शे की, ‘त्या सर्व देवनी शिकाडेल असा व्हतीन’ ६:४५ त्या सर्व देवनी शिकाडेल असा व्हतीन, यशया ५४:१३जो कोणी बापनं ऐकीन शिकेल शे तोच मनाकडे येस. 46 देवबापले कोणी दखेल शे अस नही जो देवपाईन शे त्यानी मात्र देवबापले दखेल शे. 47 मी तुमले खरंखरं सांगस; जो ईश्वास धरस त्याले सार्वकालिक जिवन शे.