5 तवय येशुनी नजर वर करीसन अनं लोकसनी गर्दी आपलाकडे ई राहीना अस दखीन फिलीप्पले सांगं, "यासले खावाले भाकरी आपण कोठेन ईकत आणान्या?" 6 त्यानी हाई तर फिलीप्पनी परिक्षा दखाकरता सांगं; तो काय कराव शे, हाई त्याले माहीत व्हतं.
7 फिलीप्पनी उत्तर दिधं, "यासनामातीन प्रत्येकनी थोडं थोडं लिधं तरी दोनशे चांदिना शिक्कासना६:७ दोनशे चांदीना शिक्का तवय आठ महिनानी कमाई व्हती, जवळपास चाळीस हजार रूपया ईकत लेयल भाकरी पुरावत नही."