53 यावर येशु त्यासले बोलना, मी तुमले खरंखरं सांगस, तुम्हीन मनुष्यना पोऱ्यानं शरीर खादं नही अनी मनं रक्त पिधं नही तर तुमनामा जिवन नही. 54 जो मनं शरीर खास अनं जो मनं रक्त पेस त्याले सार्वकालिक जिवन शे, त्याले शेवटला दिनले मी ऊठाडसु. 55 कारण मनं शरीर खरं जेवण शे; अनं मनं रक्त खरं पेय शे. 56 जो मनं शरीर खास अनं मनं रक्त पेस तो मनामा ऱ्हास, अनी मी त्यानामा ऱ्हास. 57 जसं जिवत देवबापनी माले धाडं, अनी मी देवबापमुये जिवत शे, तसं जो माले खास तो बी मनामुये वाची. 58 स्वर्गतीन उतरेल जी भाकर ती हाईच शे; हाई तीनामायक नही जी तुमना पुर्वजसंनी खादी, अनी नंतर मरी गयात, तशी हाई नही; जो हाई भाकर खास तो सर्वकाळ वाची.