जखऱ्यानी भविष्यवाणी
67 योहानना बाप जखऱ्या ह्यानी पवित्र आत्मातीन परिपूर्ण व्हईसन संदेश दिधा, तो असा;
68 इस्त्राएलसना देव प्रभु, धन्यवादित शे,
कारण त्यानी आपला लोकसनी भेट लिसन त्यासले मुक्ती देयल शे.
69 त्यानी आमनाकरता आपला सेवक
दावीदना घरानामा सामर्थ्यवान उध्दारक देयल शे.
70 जसं की त्यानी सुरवात पाईन आपला पवित्र संदेष्टासद्वारे सांगेल व्हतं.
71 की, आमना शत्रुसपाईन अनी व्देष करनारासना हाततीन
आमनं तारण व्हई
72 यानाकरता की, त्यानी आमना पुर्वजसंवर दया कराले पाहिजे
अनी आपला पवित्र करारनी,
73 म्हणजे जी शपथ त्यानी आमना बाप अब्राहाम
याले देयल शे त्यानी आठवण कराले पाहिजे
74 ती हाई की तुम्हीन आपला शत्रुसना हातमातीन सुटीन,
75 मनासमोर पवित्रतातीन अनं धार्मीकतातीन
आयुष्यभर मनी सेवा नही घाबरता करशात अस मी करसु.
76 "अनी हे बाळ, तुले परमप्रधान देवना संदेष्टा म्हणतीन,
कारण प्रभुनी वाट तयार कराकरता
तु त्यानापुढे चालशी,
77 यानाकरता की त्याना लोकसले त्यासना पापना माफीघाई
तारणनं ज्ञान देवाकरता.
78 आमना देवना परमकृपातीन हाई व्हयेल शे.
म्हणीन आमनावर वरतीन तारणना प्रकाश चमकी
79 ‘यानाकरता की अंधारमा अनं मृत्युना सावलीमा बशेलसले
तो प्रकाश भेटी’ अनी आमना पाय शांतीना वाटवर चालतिन."