15 आखो तो त्यासले बोलना, "संभाळा, सर्व प्रकारना लोभपाईन दुर ऱ्हा; एखादाकडे बरीच संपत्ती राहीनी, तर ते त्यानं जिवन व्हई जास अस नही."
16 येशुनी त्यासले एक दृष्टांत सांगा; "एक श्रीमंत माणुसना जमीनले बरच पिक वनं. 17 तवय त्यानी आपला मनमा असा ईचार करा की, मी काय करू? कारण मनं हाई उत्पन्न साठाडाकरता जागा नही. 18 मंग त्यानी सांगं, मी अस करसु, मन्या ज्या कोठ्या शेतस त्या मोडीन मोठ्या बांधसु अनी तठे मी सर्व धान्य अनं माल साठाडसु. 19 मंग मी स्वतःले म्हणसु, ‘हे नशिबवान माणुस, तुले बराच वरीस पुरी ईतला बराच माल ठेल शे; आराम कर, खाय, पी, आनंद कर!’ 20 पण देवनी त्याले सांगं, ‘अरे मुर्ख, आज रात तुले देवाज्ञा व्हई; तवय जे काही तु कमाडेल शे ते कोणं व्हई?’"
21 "जो कोणी स्वतःकरता धन गोया करस पण देवबद्दलन्या गोष्टीसमा धनवान नही तर तो या श्रीमंत माणुसना मायकच शे."