येशु त्याना शिष्यसले हिम्मत देस
4 "मना मित्रसवन, मी तुमले सांगस, ज्या शरिरना वध करतस पण त्यानानंतर आखो त्यासनाघाई काहीच व्हत नही असासले घाबरू नका. 5 तुम्हीन कोणले घाबरीसन राहावाले पाहिजे हाई मी तुमले सुचाडस; जीव लेवावर नरकमा टाकानं ज्यानामा सामर्थ्य शे त्या परमेश्वरले घाबरीसन ऱ्हा, हा, मी तुमले सांगस परमेश्वरलेच घाबरीसन ऱ्हा!"