येशु आराम दिनले रोगीले बरं करस
1 येशु शब्बाथ दिनले परूशीस माधला एक अधिकारीना घर जेवाले गया, अनं लोके येशुले जवळतीन दखी राहींतात; 2 तवय येशुजोडे हात पाय सुजाना आजार व्हयेल एक माणुस वना. 3 येशुनी शास्त्रीसले अनं परूशीसले ईचारं, नियमप्रमाणे शब्बाथ दिनले रोग बरं करनं हाई चांगलं शे का नही? 4 तवय त्या चुप राहीनात. मंग त्यानी त्याले स्पर्श करीसन बरं करं अनं धाडी दिधं.