4 तुमनामा असा कोण माणुस शे की, त्यानाजोडे शंभर मेंढरं शेतस अनं त्यानामातीन एक दवडी गयं. तर त्या बाकीना नव्यान्नव मेंढरंसले जंगलमा सोडीसन ते दवडायेल मेंढरू सापडस नही तोपावत तो त्याना शोध करस नही? 5 ते मेंढरू सापडावर तो त्याले आनंदमा खांदावर लेस; 6 अनी घर ईसन मित्रसले अनं शेजारीसले बलाईसन सांगस, मनं दवडायेल मेंढरू सापडनं शे, म्हणीन तुम्हीन मना बराबर आनंद करा. 7 त्यानामायकच ज्यासनी पहिलेच पाप करानं सोडी दिधं असा नव्याण्णव धार्मीकसबद्दल व्हनारा आनंदपेक्षा पश्चाताप करनारा एक पापी माणुसबद्दल स्वर्गमा जास्त आनंद व्हस, हाई मी तुमले सांगस.