12 अनी तो एक गावमा गया तवय त्याले कोड व्हयेल दहा माणसे भेटनात तवय त्या दुर उभा राहीसन. 13 अनी त्या वरडीन बोलनात, "हे येशु, प्रभु, आमनावर दया करा." 14 त्यानी त्यासले दखीन सांगं, "तुम्हीन स्वतः जाईसन याजकसले दखाडा" मंग अस व्हयनं की, जाता जाताच त्या शुध्द व्हयनात. 15 जवय त्यासनामाईन एकजणनी दखं की, मी बरा व्हई जायेल शे तवय तो आंनदमा देवना गौरव करीसन परत वना; 16 अनी त्याना उपकार मानीसन त्याना पायसनाजोडे उपडा पडना; तो माणुस शोमरोनी व्हता. 17 तवय येशुनी सांगं, दहाना दहा शुध्द व्हयेल व्हतात ना? मंग नऊ जण कोठे शेतस? 18 हाऊ गैरयहुदी माणुसनाशिवाय देवले धन्यवाद देवाले कोणीच परत वना नही का? 19 अनी येशु त्याले बोलना, ऊठ अनं जाय तुना ईश्वासनी तुले चांगलं करेल शे.