अन्यायी न्यायाधीश
1 त्यासनी नाराज व्हवाले नको अनं कायम प्रार्थनामा ऱ्हावाले पाहिजे, यानाकरता येशुनी त्यासले एक दृष्टांत दिसन शिकाडं. 2 एक नगरमा कोणी एक न्यायाधीश व्हता, तो देवले घाबरे नही अनं माणससनी बी पर्वा करे नही; 3 अनी त्याच नगरमा एक विधवा व्हती, ती त्यानाकडे कायम ईसन अस सांगे, की, मना न्याय करीसन माले मना विरोधीपाईन सोडाव. 4 तरी त्यानी ते बराच काळ पर्यंत करा नही; मंग तो आपला मनमा बोलना, जरी मी देवले घाबरत नही अनं माणससनी पर्वा करस नही, 5 पण हाई विधवा माले त्रास देस म्हणीसन मी तिना न्याय करसु, नही तर ती कायम ईसन माले त्रास देत ऱ्हाई. 6 तवय प्रभु बोलना, अन्यायी न्यायाधीश काय म्हणस ते ऐका. 7 तर ज्या देवना निवडेल लोके शेतस त्या रात्रंदिन रडी रडी मदत करता त्याले हाक मारतस त्यासना तो न्याय करावु नही का? अनी त्यासना न्याय कराले तो येळ लाई का? 8 अनी मी तुमले सांगस, तो त्यासना न्याय लवकर करी; तरी पण मनुष्यना पोऱ्या म्हणजे मी ईसु तवय माले पृथ्वीवर ईश्वास सापडी का?