आंधया बार्तीमयले दृष्टीदान
35 येशु यरीहो जोडे वना तवय अस व्हयनं की, एक आंधया वाटमा भीक मांगत बशेल व्हता; 36 त्यानी जोडेतीन जाणारी लोकसनी गर्दीना आवाज ऐकीन ईचारं, हाई काय शे?
37 त्यासनी त्याले सांगं, येशु नासरेथकर आठेन जाई राहिना.
38 तवय तो वरडीन बोलना, "हे येशु, दावीदना पोऱ्या! मनावर दया कर!"
39 मंग त्यानी गप्प ऱ्हावाले पाहिजे म्हणीन पुढे चालनारासनी त्याले दताडं; तरी पण तो आखो जास्तच वरडीन बोलना, हे दावीदना पोऱ्या, मनावर दया कर.
40 तवय येशुनी उभं राहिन आज्ञा करी की, त्या आंधया माणुसले मनाकडे लई या, तो जोडे येवावर त्यानी त्याले ईचारं, 41 मी तुनाकरता काय करू अशी तुनी ईच्छा शे? तो बोलना, प्रभु, माले परत दृष्टी मिळु दे.
42 येशु त्याले बोलना, तुले दृष्टी मिळो, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे.
43 त्याच क्षणले त्याले दखावाले लागणं अनं अनी तो देवना गौरव करीसन त्यानामांगे चालाले लागना; तवय सर्व लोकसनी हाई दखीन देवना उपकार मानात.