येशुना येरूशलेमा प्रवेश
28 ह्या गोष्टी सांगिसन तो यरूशलेममा जातांना स्वतः पुढे चाली राहींता. 29 मंग अस व्हयनं की, ज्याले जैतुनना डोंगर म्हणतस त्या डोंगरजोडेना बेथफगे अनं बेथानी ह्या गावसनाजोडे तो ईसन पोहचावर त्यानी शिष्यसमाईन दोन जणसले अस सांगीसन धाडं की, 30 "तुम्हीन समोरना गावमा जा; म्हणजे तठे जाताच ज्यानावर कोणी कधी बशेल नही अस एक शिंगरू बांधेल तुमले सापडी, त्याले सोडीसन आणा. 31 शिंगरूले कसाले सोडी राहिनात अस जर तुमले कोणी ईचारं, तर प्रभुले यानी गरज शे, अस सांगा." 32 तवय ज्यासले धाडेल व्हतं त्या तठे जावावर त्यासले त्यानी सांगेल प्रमाणे घडणं. 33 त्या शिंगरू सोडी राहींतात तवय शिंगरूना मालक त्यासले बोलना, "शिंगरू कसाले सोडी राहिनात?" 34 तवय त्या बोलनात, "प्रभुले ह्यानी गरज शे." 35 मंग त्यासनी शिंगरूले येशुजोडे आनं, अनी आपला कपडा त्या शिंगरूवर टाकीसन त्यावर येशुले बसाडं. 36 अनी जसं तो पुढं जावाले लागना तसा लोके आपला कपडा वाटवर पसारत गयात. 37 तो जैतुन डोंगरना उतरतीवर पोचतास सर्व शिष्यसनी गर्दी आनंद करीसन मोठा आवाजमा देवनी स्तुती करीसन बोलु लागनात. 38 "प्रभुना नावतीन येणारा राजा आशिर्वादित राहो; स्वर्गमा शांती, अनी परमेश्वरना गौरव!"
39 तवय लोकसनी गर्दीमाईन काही परूशीसनी त्याले सांगं, "गुरजी, आपला शिष्यसले शांत ऱ्हावाले आज्ञा द्या!" 40 येशु त्यासले बोलना, "मी तुमले सांगस, या जर गप्प राहिनात तर धोंडा वरडतीन."