येशुले मंदिरमा लयतस
22 मोशेना नियमशास्त्रप्रमाणे योसेफ अनी मरीयाना शुध्दीकरणना दिन भरनात तवय त्या बाळले देवले अर्पण कराकरता यरूशलेमले लई वनात. 23 जसं की प्रभुना नियमशास्त्रमा लिखेल शे; "प्रत्येक पहिला जन्मेल नर प्रभुले अर्पण कराना." 24 अनी प्रभुना नियमशास्त्रमा लिखेलप्रमाणे, पारवासनी जोडी किंवा कबुतरना दोन पिल्ला आनीसन त्यासनं अर्पण करानं, याकरता त्यासनी त्याले यरूशलेमले आनं.
25 यरूशलेममा शिमोन नावना एक धार्मीक अनी भक्ती करनारा माणुस व्हता, तो इस्त्राएलले वाचाडनारानी वाट दखी राहिंता अनी पवित्र आत्मा त्यानासंगे व्हता. 26 अनी प्रभु ख्रिस्तले दखाना पहिले तु मराव नही अस पवित्र आत्मानी त्याले प्रकट करेल व्हतं 27 शिमोन पवित्र आत्माना प्रेरणातीन मंदिरमा वना अनी जवय नियमशास्त्रना विधीप्रमाणे कराकरता येशु बाळाना मायबाप त्याले मंदिरमा लई वनात, 28 तवय शिमोननी त्याले हातमा लिधं अनं देवले धन्यवाद दिसन बोलना;
29 "हे प्रभु, आते तु माले जे वचन देयल व्हतं तसं,
तूना दासले म्हणजे माले शांतीमा मरू दे.
30 कारण मना डोयासनी तुना ऊध्दार दखी लयेल शे,
31 ज्याले तु सर्व लोकसना समोर तयार करेल शे;
32 की, तो गैरयहूदी लोकसकरता प्रकाश
अनी तुना इस्त्राएलना लोकसनं वैभव राही."
33 शिमोननी येशु बाळबद्दल सांगेल गोष्टीसवरतीन त्याना माय बापले आश्चर्य वाटणं. 34 शिमोननी त्यासले आशिर्वाद दिसन येशुनी माय मरीयाले सांगं दख, "हाई बाळ इस्त्राएलमधला बराच जणसना नाश अनं तारण याकरता अनी ज्यानाविरूध्द लोक बोलतीन असं चिन्ह व्हवाकरता याले देवनी निवडेल शे 35 यामुये बराच लोकसना मनमाधला ईचार उघड व्हवाकरता तुना स्वतःना हृदयले तलवारनामायक दुःख चिरी जाई."
36 आशेरना वंशमातील फनूएलनी पोर हन्ना नावनी एक संदेष्टी व्हती, ती लगीनना सात वरीस नंतर तिना नवरा मरी गया, ती भलती म्हतारी व्हयेल व्हती. 37 आते ती चौऱ्यांशी वरीसनी विधवा व्हती, तरी ती देवनं मंदिर कधीच सोडीन नही जाता रातदिन देवनी भक्ती करे अनं उपास प्रार्थना करे. 38 त्याच येळले तिनी ईसन देवना आभार मानात अनी यरूशलेमनी सुटकानी ज्या वाट दखी राहींतात त्या सर्वासले तिनी त्या बाळबद्दल सांगं.