येशुबाळ मंदिरमा
41 येशुना मायबाप दर वरीसले वल्हांडण सणकरता यरूशलेमले जायेत. 42 अनी तो बारा वरीसना व्हयना तवय त्या सणना रितप्रमाणे तठे गयात. 43 मंग सण सरानंतर त्या घर जावाले निंघनात, तवय तो पोऱ्या येशु मांगे यरूशलेममा राही गया हाई त्याना माय बापले समजनं नही; 44 तो वाटमाधला प्रवाशीससंगे येत व्हई, असं समजीन त्या एक दिननी वाट चाली गयात; नंतर त्या नातेवाईक अनं वळखना लोकसमा त्याना शोध कराले लागनात. 45 पण तो त्यासले सापडना नही, म्हणीन त्या त्याना शोध करत करत यरूशलेमले परत गयात. 46 मंग अस व्हयनं की तिन दिन नंतर तो मंदिरमा गुरूमंडळीमा बशीन त्यासनं भाषण ऐकतांना अनं त्यासले प्रश्न ईचारतांना त्यासले दखायना. 47 ज्या सर्वाजन त्यानं ऐकी राहींतात त्या त्यानी बुध्दी वरतीन अनं उत्तरसवरतीन थक्क व्हयनात. 48 तवय त्याले दखीसन त्याना माय बापले आश्चर्य वाटनं, अनी त्यानी माय त्याले बोलनी, "बाळा, तु आमनासंगे का बर असा वागना? तुना बाप अनी मी काळजी करीसन तुना शोध करत वनुत."
49 तो त्यासले बोलना, "तुम्हीन माले का बर शोधी राहींतात? तुमले माहीत नही का की, माले मना बापना घरमा ऱ्हावाले पाहिजे?" 50 पण तो जे बोलना ते त्यासले समजनं नही.
51 मंग तो त्यासनासंगे निंघीन नासरेथले गया अनं त्यासनी आज्ञामा राहीना; त्यानी मायनी ह्या सर्व गोष्टी आपला मनमाच ठेयात. 52 येशु हाऊ ज्ञानघाई, शरीरघाई अनी माणुसना अनी परमेश्वरनी कृपामा वाढत गया.