42 "हे बापा, तुनी ईच्छा व्हई तर हाऊ दुःखना प्याला मनापाईन दूर कर, तरी मना ईच्छाप्रमाणे नही, तर तुना ईच्छाप्रमाणं होऊ दे." 43 तवय स्वर्गामाईन एक देवदूत ईसन आपले बळ दि राहीना अस त्यानी दखं. 44 मंग तो भलताच व्याकुळ व्हईना अनं त्यानी भलती कळकळ करीसन प्रार्थना करी, तवय त्याना घाम रंगतना मोठं मोठा थेंब जमीनवर पडतस असा पडी राहिंता.
Publicidade