पेत्र येशुले नकारस
54 मंग त्या येशुले कैद करीसन मुख्य याजकना घर लई गयात; मंग पेत्र दुरतीन त्याना मांगेमांगे चालु लागना, 55 राजवाडाना अंगनणा मध्यभागमा ईस्तव पेटाडीसन ज्या एकत्र बसेल व्हतात, त्यासनामा पेत्र पण जाईन बसना. 56 तवय एक दासीनी त्याले ईस्तव जोडे बसेल दखीसन त्यानाकडे टक लाईन सांगं, "हाऊ पण येशुसंगे व्हता!" 57 पण तो नाकारीसन बोलना, "बाई, मी त्याले वळखत नही!" 58 थोडा येळमा दुसरा एकनी त्याले दखीसन सांगं, "तु बी त्यासनामधलाच शे!"
पण पेत्र त्याले बोलना, "नही हो, मी नही शे!"
59 जवळजवळ एक तास व्हवावर आखो एकजण खात्री दिसन सांगु लागना, "खरच हाऊ बी येशुनासंगे व्हता; हाऊ गालीलीच शे!" 60 पेत्र बोलना, "अरे भाऊ, माले नही माहीत तु कशाबद्दल बोली राहिना!"
अस तो बोलीच राहिंता इतलामा कोंबडा कोकावना. 61 तवय प्रभुनी वळीसन पेत्रकडे दखं अनी "पहाटले कोंबडा कोकावाना पहिले तु तिन येळा माले नाकारशी" अस जे प्रभुनी पेत्रले सांगं व्हतं ते त्याले आठवण. 62 मंग पेत्र बाहेर जाईन हुंदका दिन रडना.