येशु बराच लोकसले बरं करस
38 मंग येशु सभास्थान माईन ऊठीसन शिमोनना घर गया. शिमोननी सासु जास्तच तापमा पडेल व्हती, तिनाकरता त्यासनी त्याले ईनंती करी. 39 तिनाजोडे उभं राहीन येशुनी तापले दताडं, तवय तो निंघी गया, अनी त्याच क्षणले ती ऊठीसन त्यासनी सेवा कराले लागनी.