18 तवय दखा, काही लोके एक लखवा व्हयेल माणुसले खाटवर लई वनात अनं त्याले मझार लई जाईन त्याना समोर ठेवाना प्रयत्न करा. 19 पण गर्दीमुये त्याले मझार लई जावाले त्यासले जमी नही राहिंतं, म्हणीन त्यासनी घरवर चढीन कौलं काढीन त्याले खाटसंगेच येशु समोर खाल उतारी दिधं. 20 तवय ज्या त्याले लई वनात त्यासना ईश्वास दखीन येशु बोलना, "हे माणुस, तुना पापसनी क्षमा व्हयेल शे."
21 तवय काही शास्त्री अनं परूशी एकमेकसले बोलाले लागनात, "हाऊ कोण शे अस बोलणारा हाऊ तर देवनी निंदा करी राहिना! फक्त देवच पापसनी क्षमा करू शकस!"
22 येशुनी त्यासना ईचार वळखीन त्यासले सांगं, "तुम्हीन ह्या गोष्टीसना का बर ईचार करतस? 23 ‘तुना पापसनी क्षमा व्हयेल शे’ हाई बोलनं, की, ‘ऊठीसन चाल हाई बोलनं,’ यामातीन कोणतं सोपं शे? 24 पृथ्वीवर पापसनी क्षमा कराले मनुष्यना पोऱ्याले म्हणजे माले अधिकार शे." मंग येशु लखवा व्हयेल माणुसले बोलना, "मी तुले सांगस, ऊठ, आपली खाट उचलीसन घर जा!"
25 तवय तो लगेच त्यासनासमोर ऊठीसन ज्या खाटवर तो झोपेल व्हता, ती उचलीन देवना गौरव करत घर गया.