उपासना प्रश्न
33 काही लोके येशुले बोलनात, "बाप्तिस्मा करनारा योहानना शिष्य कायम उपास अनं प्रार्थना करतस, अनी तसच परूशीसना शिष्य बी करतस; पण तुना शिष्य खातस पितस."
34 येशुनी उत्तर दिधं, "तुमले वाटस का जोपावत वऱ्हाडीसनासंगे नवरदेव शे तोपावत तुम्हीन त्यासना कडतीन उपास करी लेवु शकतस? 35 तरी असा दिन येतीन जवय त्यासकडतीन नवरदेवले काढीन लई जातीन त्या दिनसमा त्या उपास करतीन."