दुसरासना दोष काढाबद्दल
37 "तुम्हीन कोणाच न्यायनिवाडा करू नका म्हणजे तुमना न्यायनिवाडा कोणी कराव नही; कोणलेच दोषी ठरावु नका म्हणजे कोणी तुमले दोषी ठरावनार नही; क्षमा करा म्हणजे देव तुमले बी क्षमा करी. 38 द्या म्हणजे परमेश्वर तुमले बी दि; चांगलं माप दाबीन, हालाईन वरपावत भरीन तुमना पदरमा टाकतीन; कारण ज्या मापघाई तुम्हीन मोजीन देतस त्याच मापघाई देवपाईन तुमले मोजीन भेटी."