वाळेल हातना माणुस
6 नंतर शब्बाथ दिनले अस व्हयनं की, येशुनी सभास्थानमा जाईसन शिकाडं, तठे उजवा हात वाळेल एक माणुस व्हता. 7 येशु शब्बाथ दिनले रोग बरा करस की काय करस म्हणीन शास्त्री अनं परूशी त्यानावर आरोप कराले टपीन बशेल व्हतात. 8 पण त्यानी त्यासना ईचार वळखीन त्या हात वाळेल माणुसले सांगं, "ऊठ अनं मझार उभा ऱ्हाय." मंग तो उठीसन उभा राहिना. 9 तवय येशु त्यासले बोलना, मी तुमले ईचारस, नियमप्रमाणे शब्बाथ दिनले एखादाले मदत करानं चांगलं की, वाईट करानं चांगलं? जीव वाचाडानं चांगलं की, जीव लेवानं चांगलं? 10 मंग त्यानी आजुबाजू सर्वासकडे दखीन त्याले सांगं, "हात सरळ कर" तवय त्यानी तसच करं अनं त्याना हात बरा व्हयना.