येशु विधवाना पोऱ्याले जिवत करस
11 नंतर लवकरच अस व्हयनं की येशु नाईन गावले गया; अनी त्याना शिष्य अनं लोकसनी मोठी गर्दी त्यानासंगे गयी. 12 तो गावना वेशीजोडे ई पोहचना तवय दखा, लोके एक मरेल पोऱ्याले बुंजाले लई जाई राहींतात; तो त्यानी मायना एकुलता एक पोऱ्या व्हता, त्यानी माय विधवा व्हती. अनी त्या गावना बराच लोके तिनासंगे व्हतात. 13 तिले दखीन प्रभुले तिनी दया वनी, अनी तो तिले बोलना, "रडू नको." 14 मंग जोडे जाईन येशुनी तिरडीले स्पर्श करा; तवय खांदेकरी उभा राहीनात; अनी तो बोलना, "पोऱ्या! मी तुले सांगस, ऊठ!" 15 तवय तो मरेल पोऱ्या ऊठीसन बसना अनं बोलु लागना. मंग येशुनी त्याले त्यानी मायना हवाले करं.
16 तवय सर्वासमा भिती भराई गयी, अनी त्या देवना गौरव करीसन बोलनात, "आमनामा मोठा संदेष्टा येल शे! अनी देवनी आपला लोकसले वाचडाले येल शे!"
17 त्यानाबद्दलनी हाई बातमी सगळा यहूदीयाना अनं चारीमेरन्या प्रांतमा पसरनी.