24 मंग योहानना निरोपी गयात तवय येशु योहानबद्दल लोकसनी गर्दीले बोलु लागना, "तुम्हीन काय दखाले जंगलमा जायेल व्हतात? वाराघाई हालायेल गवत का? 25 तर काय दखाले जायेल व्हतात? मऊ कपडा घालेल माणुसले का? दखा, भडक कपडा घालणारा अनं सुख उपभोगणारा, त्या राजवाडामाच राहतस. 26 माले सांगा, तुम्हीन काय दखाले जायेल व्हतात? संदेष्टाले का? हो, मी तुमले सांगस, संदेष्टासपेक्षा जो श्रेष्ठ त्याले. 27 योहानबद्दल शास्त्र अस सांगस की; ‘देव बोलना, मी मना दूतले तुनापुढे धाडसं, तो तुनी वाट तयार करी.’ 28 मी तुमले सांगस, बायासपाईन जन्मेल लोकसमा योहानपेक्षा श्रेष्ठ कोणी नही; तरी देवना राज्यमा धाकलात धाकला जो शे तो योहानपेक्षा बी श्रेष्ठ शे."
29 ७:२९ मत्तय २१:३२; लूक ३:१२ जवय लोकसनी अनी जकातदारसनी हाई सर्व ऐकं तवय योहान कडतीन बाप्तिस्मा लिसन देवना मार्ग बराबर शे हाई मान्य करं. 30 पण परूशी अनं शास्त्री लोकसनी योहान कडतीन बाप्तिस्मा करी लिधा नही आपला संबंधमा देवनी योजनाना स्विकार करा नही.