याईरनी मरेल पोर अनी रक्तस्रावी बाई
40 मंग येशु माघारे वना तवय लोकसनी गर्दीनी त्यानं स्वागत करं; त्या सर्व त्यानी वाट दखी राहींता. 41 तवय दखा याईर नावना कोणी एक माणुस वना, तो सभास्थानना अधिकारी व्हता; तो येशुना पाया पडीन, तुम्हीन मना घर या, अशी त्याले ईनंती करी, 42 कारण त्यानी बारा वरीसनी एकुलती एक पोर मराले टेकेल व्हती.
मंग येशु जाई राहिंता तवय लोकसनी त्याना आजुबाजू गर्दी व्हती. 43 तवय अशी एक बाई, जीले बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हता अनी तिनी आपली सर्वी कमाई बरं व्हवाकरता खर्ची टाकी तरी ती बरि व्हयेल नव्हती. 44 तिनी येशुना मांगेन ईसन त्याना कपडाना गोंडाले स्पर्श करा, अनी त्याच येळले तिना रक्तस्राव बंद व्हयना. 45 येशु बोलना, "माले कोणी स्पर्श करा?"
तवय सर्वा लोके मी नही, अस म्हणी राहींतात तवय पेत्र बोलना, "प्रभु, लोकसनी गर्दी तुमले दाटी करीसन चेंगरी ऱ्हायनी."
46 पण येशु बोलना, "कोणी तरी माले स्पर्श कराच; मनातीन शक्ती निंघनी, हाई माले समजनं." 47 मंग ती बाईनी दखं की, आते आपण दपु नही शकतस म्हणीन घाबरीन कापत कापत ईसन त्याना समोर पडनी, मी कोणता कारणमुये याले स्पर्श करा अनी कशी लगेच बरी व्हयनी, हाई तिनी सर्व लोकसना समोर सांगी टाकं. 48 तवय येशु तिले बोलना, "बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे, सुखरूप जाय."
49 येशु बोलीच राहींता ईतलामा यहूदी सभास्थानना अधिकारीले त्याना घरतीन कोणी ईसन सांगं, "तुमनी पोर मरी गई, आते गुरजीले कष्ट देवु नका."
50 ते ऐकीन येशु याईरले बोलना, भिऊ नको, "फक्त ईश्वास ठेव म्हणजे ती बरी व्हई."
51 मंग येशु घर वना तवय पेत्र, याकोब अनं योहान पोरना मायबाप यासना शिवाय आपलासंगे कोणलेच त्यानी मझार येवु दिधं नही. 52 ती पोरकरता सर्वाजन रडी अनी शोक करी राहींतात; पण येशु बोलना, "रडु नका; कारण ती मरेल नही, झोपेल शे!"
53 ती मरी जायेल शे हाई त्यासले माहीत व्हतं म्हणीन त्यासनी त्यानी थट्टा करी. 54 मंग येशुनी तिना हात धरीन, पोर, ऊठ! अस जोरमा सांगं. 55 तवय तिना जिव परत वना, अनं ती लगेच ऊठनी, मंग तिले खावाले द्या अशी येशुनी त्यासले आज्ञा करी. 56 तवय तिना मायबाप थक्क व्हयनात, पण हाई घडेल गोष्ट कोणलेच सांगु नका, अस त्यानी त्यासले ताकिद दिसन सांगं.