43 तवय अशी एक बाई, जीले बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हता अनी तिनी आपली सर्वी कमाई बरं व्हवाकरता खर्ची टाकी तरी ती बरि व्हयेल नव्हती. 44 तिनी येशुना मांगेन ईसन त्याना कपडाना गोंडाले स्पर्श करा, अनी त्याच येळले तिना रक्तस्राव बंद व्हयना. 45 येशु बोलना, "माले कोणी स्पर्श करा?"
तवय सर्वा लोके मी नही, अस म्हणी राहींतात तवय पेत्र बोलना, "प्रभु, लोकसनी गर्दी तुमले दाटी करीसन चेंगरी ऱ्हायनी."
46 पण येशु बोलना, "कोणी तरी माले स्पर्श कराच; मनातीन शक्ती निंघनी, हाई माले समजनं." 47 मंग ती बाईनी दखं की, आते आपण दपु नही शकतस म्हणीन घाबरीन कापत कापत ईसन त्याना समोर पडनी, मी कोणता कारणमुये याले स्पर्श करा अनी कशी लगेच बरी व्हयनी, हाई तिनी सर्व लोकसना समोर सांगी टाकं. 48 तवय येशु तिले बोलना, "बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे, सुखरूप जाय."