12 जवय सुर्य बुडाले लागना, तवय बारा शिष्य ईसन त्याले बोलनात, "लोकसनी गर्दीले धाडी द्या, म्हणजे त्या आजुबाजूना गावसमा अनं वावरसमा जाईन ऱ्हावाले अनं खावाले काहीतरी शोधतीन, कारण आपण आठे एकांतमा शेतस."
13 पण येशु त्यासले बोलना, तुम्हीनच त्यासले काहीतरी खावाले द्या.
त्या बोलनात, आमनाकडे पाच भाकरी अनं दोन मासा यासना शिवाय काहीच नही, तुमले काय वाटस आमले जाईन या लोकसकरता जेवण ईकत लईनं पडी का? 14 त्या जवळपास पाच हजार माणसे व्हतात.
तवय येशुनी आपला शिष्यसले सांगं की, पन्नास पन्नासन्या पंगतमा त्यासले बसाडा.
15 त्यासनी तसच सर्वासले बसाडं. 16 तवय येशुनी त्या पाच भाकरी अनं त्या दोन मासा लिसन वर स्वर्गकडे दखीन देवना उपकार मानात, अनी त्या मोडीन लोकसनी गर्दीले वाढाकरता शिष्यकडे दिध्यात. 17 तवय सर्वजण जेवण करीसन तृप्त व्हयनात, अनी त्यासनी जे उरेल व्हतं त्याना बारा डालक्या उचल्यात.