38 तवय गर्दीमातीन एक माणुस जोरमा वरडीन बोलना, "प्रभु! मी तुमले ईनंती करस, मना पोऱ्याकडे दखा! कारण हाऊ मना एकुलता एक पोऱ्या शे! 39 एक दुष्ट आत्मा त्याले धरस अनी तो अचानक वरडस, तो त्याले असा पिळस की, त्याना तोंडमाईन फेस निंघस; त्याले भलता ठेचस अनं लवकर बी सोडस नही. 40 तुमना शिष्यसनी दुष्ट आत्मा काढाले पाहिजे म्हणीन मी त्यासले ईनंती करी, पण त्यासले काढता वनं नही."
41 येशुनी त्यासले उत्तर दिधं, "हे अईश्वासी अनं चुकायल पिढी! मी कोठपावत तुमनासंगे ऱ्हासु? अनं सहन करू?" तो त्या माणुसले बोलना, "तु तुना पोऱ्याले मनाकडे लई ये."
42 तो पोऱ्या येशु जोडे ई राहींता ईतलामा दुष्ट आत्मानी त्याले आपटं अनं पिळी टाकं. येशुनी त्या दुष्ट आत्माले धमकाडं, अनी पोऱ्याले बरं करीसन त्याना बापजोडे दिधं. 43 तवय देवनी महानता दखीन सर्व लोके आश्चर्यचकीत व्हयनात.
दुसरांदाव येशुनी आपला मृत्युबद्दल करेल भविष्य
येशुनी करेल सर्व कृत्यसवरतीन सर्व लोक आश्चर्य करी राहींतात तवय येशु त्याना शिष्यसले बोलना,