57 तवय अस व्हयनं की त्या वाटतीन चाली राहींतात तवय एकनी येशुले सांगं, "तुम्हीन जठे कोठे जाशात तठे मी तुमना मांगे ईसु."
58 येशु त्याले बोलना, "कोल्हासकरता बिळा अनं आकाशमाधला पक्षीसले घरटा शेतस, पण मनुष्यना पोऱ्याले डोकं टेकाले जागा नही."
59 येशुनी दुसराले सांगं, "मनामांगे ये."
पण तो बोलना, "प्रभुजी, माले पहीले मना बापले पुराले जावु द्या."
60 येशुनी उत्तर दिधं, "मरेलसलेच त्यासना मरेलसले पुरू दे, तु जाईन देवना राज्यना सुवार्ताना प्रचार कर."
61 त्यावर आखो एकजण बोलना, "प्रभुजी, मी तुमना मांगे ईसु, पण पहिले माले मना घरना मंडळीले निरोप देवु दे."
62 येशुनी त्याले सांगं, "जो कोणी नांगरले हात लावावर मांगे दखस, त्याना देवना राज्यमा उपयोग नही."