गरीबसले उधार देवानं
35 तुना कोनी भाऊ कंगाल व्हयना अनी त्याना हात काम नही करी राहिना आशे तुले दखायनं तर तु त्याले आधार देवानं. परदेशीपरमानं नहीतर उपर्यासपरमानं तो तुना जोडे राही. 36 त्यानापाईन व्याज किंवा फायदा लेवानं नही; आपला देवले भ्याईसनी आपलाजोडे आपला भाऊसले राहु देवानं.