येशु धाकला पोऱ्यासले आशिर्वाद देस
13 येशुनी पोऱ्यासले आशिर्वाद देवाले पाहिजे म्हणीन काही लोके आपला पोऱ्यासले येशुकडे लई वनात पण शिष्यसनी त्यासले दताडं. 14 ते दखीसन येशुले भलतं वाईट वाटनं अनी तो शिष्यसले बोलना, "धाकलासले मनाजवळ येऊ द्या त्यासले मना करू नका, कारण देवनं राज्य धाकलासना मायकच शे.