मनुष्यना पोऱ्या येशु यानं परत येनं
24 १३:२४ प्रकटीकरण ६:१२ "हाई संकट ई जावानंतर त्या दिनमा सुर्य अंधकारमय व्हई अनी चंद्र प्रकाश देवाव नही. 25 १३:२५ प्रकटीकरण ६:१३आकाशमाधला तारा पडतीन अनी आकाशमाधली शक्ती हाली जाई. 26 १३:२६ प्रकटीकरण १:७तवय मनुष्यना पोऱ्याले पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन ढगसमा येतांना त्या दखतीन. 27 त्या येळले मी देवदूतसले धाडीन पृथ्वीना एक टोकपाईन दुसरा टोकपावत चारी दिशातीन देवनी निवडेल लोकसले एकत्र करसु."