प्रभुभोजन
22 त्या जेवण करतांना येशुनी भाकर लिधी अनं उपकार मानीन तोडी अनी शिष्यसले दिसन सांगं, हाई ल्या, "हाई मनं शरीर शे."
23 मंग त्यानी प्याला लिधा अनं देवना आभार मानीन त्यासले दिधा, अनी त्यासनी ते पिधं. 24 त्यानी त्यासले सांगं, "हाई मनं रंगत देव अनी मनुष्यना करारले दखाडस, हाई बराच जणसकरता वताई जाई ऱ्हायनं. 25 मी तुमले सत्य सांगस की, मी तोपावत द्राक्षवेलना रस कधीच पिवाऊ नही जोपावत देवना राज्यमा नवा द्राक्षरस पितस नही."