6 पण येशु बोलना, "जाऊ द्या! तिले का बरं बोली राहीनात? तिनी मनाकरता एक चांगलं काम करेल शे. 7 गोरगरीब कायमना तुमना जोडेच शेतस अनी तुमले वाटी तवय त्यासनं भलं करता ई. पण मी कायम तुमनासंगे राहसु अस नही. 8 तिनाघाई जे करता ई ते तिनी करं; मना मरानंतरनी तयारी पहिलेच तिनी करी दिधी. 9 मी तुमले सत्य सांगस की, सर्व जगमा जठे जठे सुवार्ता सांगतीन, तठे तठे तिनी जे सत्कर्म करेल शे त्यानी आठवण करतीन."
Publicidade