येशुले कबरमा ठेवतस
42 तवय संध्याकाय व्हयनी, हाऊ तयारीना म्हणजे यहूदीसना शब्बाथ दिनना आदला रोज व्हता, 43 म्हणीन अरिमथाई गावना योसेफनी हिम्मत करीसन पिलातकडे जाईन येशुनं शरीर मांगं; तो महासभाना एक प्रतिष्ठीत सभासद व्हता अनी स्वतः देवनं राज्य येवानी वाट दखी राहींता.