येशु लुळा हातना माणुसले बरं करस
1 परत येशु सभास्थानमा गया, तठे लुळा हातना एक माणुस व्हता. 2 तो शब्बाथ दिन व्हता येशु त्या माणुसले बरं करस की काय करस; हाई दखाकरता काही लोके टपेल व्हतात. म्हणजे त्यानावर आरोप करानी संधी त्यासले भेटी असा त्यासना बेत व्हता. 3 येशुनी त्या लुळा हातना माणुसले सांगं "ऊठ, मजारमा उभा ऱ्हाय."
4 मंग त्यानी त्या लोकसले ईचारं, "नियमशास्त्रप्रमाणे शब्बाथ दिनले एखादाले मदत करानं चांगलं की, वाईट करानं चांगलं? जीव वाचाडानं चांगलं की, जीव लेवानं चांगलं?" पण त्या गप्पच राहीनात. 5 मंग येशुनी संतापमा चारीबाजुले दखं अनी त्या लोकसना कठीण मनले दखीसन त्याले दुःख वाटनं, त्यानी लूळा हातना माणुसले सांगं, "तुना हात सरळ कर" त्यानी हात सरळ करा, अनी त्याना हात बरा व्हयना.