येशुना परीवार
31 तवय येशुनी माय अनी त्याना भाऊ, बहिण तठे वनात, त्यासनी बाहेर उभा राहिन त्याले निरोप धाडा. 32 येशुना बाजुले बराच लोके बशेल व्हतात, त्यासनी त्याले सांगं, "दख, तुनी माय अनं तुना भाऊ, बहिण बाहेर तुनी वाट दखी राहीनात."
33 येशुनी त्यासले उत्तर दिधं, "कोण मनी माय? अनी कोण मना भाऊ?" 34 मंग त्यानी तठे बशेल लोकसकडे दखीसन सांगं, "दखा! हाई मनी माय अनी ह्या मना भाऊ, बहिण! 35 कारण जो देवनी ईच्छाप्रमाणे वागस तोच मना भाऊ अनं बहिण, अनी तीच मनी माय."