3 "ऐका! एक शेतकरी पेरणी कराकरता गया. 4 तो पेरणी करी राहिंता तवय काही दाना वाटवर पडनात त्यासले पक्षीसनी ईसन खाई टाकं. 5 काही दाना खडकाळ जमीनवर पडणात त्या लवकर उगनात पण तठे जास्त खालपावत माटी नव्हती म्हणीन त्यासले मुळकांड्याच वन्यात नहीत. 6 अनी जवय, सुर्य उगना तवय त्यासले ऊन लागनं अनं त्या सुकाई गयात. 7 काही दाना काटेरी झुडपसमा पडनात. त्या उगनात पण काटेरी झुडूप इतलं वाढनं की, त्या पिकले वाढुच दिधं नही म्हणीन पिक काय वनं नही. 8 काही दाना चांगली जमीनवर पडनात त्या उगनात, मोठा व्हईसन त्याले चांगलं पिक वनं; म्हणजे कोठे तिसपट, कोठे साठपट, तर कोठे शंभरपट पिक वनं."
9 मंग येशु बोलना, "ज्याले कान शे, तो ऐको!"