येशु वादयले शांत करस
35 त्याच दिन संध्याकाय व्हवावर येशुनी शिष्यसले सांगं, "आपण समुद्रना पलीकडे जाऊ." 36 मंग लोकसले सोडीन तो जी नाववर बशेल व्हता त्याच नावमा त्याना शिष्य त्याले संगे लई गयात. त्यासनासंगे बाकिन्या नावपण व्हत्यात. 37 थोडा येळमा मोठं वादय सुरू व्हयनं अनं मोठं-मोठल्या लाटा नाववर आदळाले लागनात. त्यामुये नावमा पाणी भराले लागनं. 38 येशु नावना मांगला बाजुले उशीवर डोकं ठिन गाड झोपेल व्हता, तवय शिष्यसनी त्याले ऊठाडं अनी त्या बोलनात, "गुरजी आपण सर्वाजन मरी जासुत ह्यानी तुमले चिंता नही का?"
39 तवय येशु ऊभा राहिना, त्यानी वादयले आज्ञा करी, "शांत व्हई जा!" अनी लाटासले तो बोलना, "थांबी जाय," तवय वादय बंद व्हई गयं अनी शांतता पसरी गयी. 40 येशुनी शिष्यसले ईचारं, "तुम्हीन ईतला का बरं घाबरी जातस? तुमले अजुन बी ईश्वास नही का?"
41 मंग शिष्य भलताच घाबरी गयात अनी एकमेकसले सांगु लागनात, "हाऊ शे तरी कोण? वादय अनी लाटा या पण ह्यानी आज्ञा पाळतस!"