37 थोडा येळमा मोठं वादय सुरू व्हयनं अनं मोठं-मोठल्या लाटा नाववर आदळाले लागनात. त्यामुये नावमा पाणी भराले लागनं. 38 येशु नावना मांगला बाजुले उशीवर डोकं ठिन गाड झोपेल व्हता, तवय शिष्यसनी त्याले ऊठाडं अनी त्या बोलनात, "गुरजी आपण सर्वाजन मरी जासुत ह्यानी तुमले चिंता नही का?"
39 तवय येशु ऊभा राहिना, त्यानी वादयले आज्ञा करी, "शांत व्हई जा!" अनी लाटासले तो बोलना, "थांबी जाय," तवय वादय बंद व्हई गयं अनी शांतता पसरी गयी. 40 येशुनी शिष्यसले ईचारं, "तुम्हीन ईतला का बरं घाबरी जातस? तुमले अजुन बी ईश्वास नही का?"
41 मंग शिष्य भलताच घाबरी गयात अनी एकमेकसले सांगु लागनात, "हाऊ शे तरी कोण? वादय अनी लाटा या पण ह्यानी आज्ञा पाळतस!"