येशु दुष्ट आत्मा लागेल माणुसले बरा करस
1 मंग येशु अनी त्याना शिष्य गालील समुद्रना पलिकडला गरसेकरसना प्रदेशमा वनात. 2 येशु नावमातीन उतरना, तवय एक दुष्ट आत्मा लागेल माणुस कब्रस्तान माईन ईसन त्याले भेटना. 3 तो कब्रस्तानमाच राहे अनं साखळ्याघाई बांधीनसुध्दा तो कोनाचघाई आवराये नही; 4 कारण त्याले बराचदाव बेड्यासघाई अनी साखळ्याघाई बांध तरी तो साखळ्या तोडी टाके अनं बेड्यासना चुराडा करे, त्याले आवरानी ताकद कोनामाच नव्हती. 5 तो रातदिन कब्रस्तानमा अनं डोंगरंसमा वरडत फिरे, स्वतःले दगडसघाई ठेचीले.
6 जवय त्यानी येशुले दुरतीन दखं, तवय तो पयत ईसन त्याना समोर पाया पडीन; 7 अनी जोरमा वरडीन बोलना, "हे येशु, परमप्रधान देवना पोऱ्या! तुले मनाकडतीन काय तरास शे? मी तुले देवनी शपथ घालस, तू माले शिक्षा देऊ नको!" 8 कारण येशु त्याले बोलना व्हता, "हे दुष्ट आत्मा, ह्या माणुस माईन निंघी जाय!"
9 येशुनी त्याले ईचारं, "तुनं नाव काय शे?" तो बोलना, "मनं नाव ‘सैन्य’ शे, कारण आम्हीन बराच शेतस!" 10 अनी आमले ह्या प्रदेशमाईन काढु नको; अशा ईनंत्या दुष्ट आत्मासनी येशुले कऱ्यात.
11 तठेच डोंगरजोडे डूकरंसना मोठा कळप चरी राहींता. 12 दुष्ट आत्मासनी त्याले ईनंती करी की, "आमले त्या डुकरंसमा घुसू दे." 13 त्यानी त्यासले परवानगी दिधी. मंग त्या दुष्ट आत्मा त्या माणुस मातीन निंघीसन डुकरंसमा घुसनात अनी त्या जवळपास दोन हजार डुकरे व्हतात. त्या पयत जाईसन कडावरतीन समुद्रमा पडीसन मरनात.
14 मंग डुकरं चारनारासनी पयत जाईसन हाई बातमी गावमा अनं वावरंसमा लोकसले सांगी. तवय काय व्हयनं हाई दखाकरता लोके तठे वनात.