25 ती गर्दीमा एक बाई व्हती तिले बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हता, 26 तिनाजोडे व्हतं नव्हतं तितलं सगळंच खर्चाई जायल व्हतं. तिले बराच तरास व्हता म्हणीन तिनी वैद्यसकडतीन ईलाज करा तरी फरक पडना नही, उलटा आजार जास्तीज वाढी जायेल व्हता. 27 ती येशु बद्दलन्या गोष्टी ऐकीसन त्या गर्दीमा घुसनी अनी त्यानाकडे ईसन त्याना कपडासले हात लाया, 28 कारण ती सांगे, "मी याना कपडासले जरी हात लावसु तरी बरी व्हसु."
29 तवय लगेच तिना रक्तस्राव बंद व्हई गया अनं तिना शरिरले जानवणं मी या आजारपाईन मुक्त व्हई जायल शे. 30 तवय येशुनी हाई लगेच वळखं की, आपलामातीन शक्ती निंघनी, तवय त्यानी मांगे वळीन गर्दीमा ईचारं, "मना कपडासले कोणी हात लाया?"
31 पण त्याना शिष्य त्याले बोलनात, "लोकसनी गर्दी आपला आजुबाजूले शे हाई तुम्हीन दखी राहीनात; तरी माले कोणी हात लाया, हाई कसं काय ईचारी राहीनात?"
32 तरी बी हाई कोणी करं, हाई दखाकरता येशुनी चारीबाजुले नजर फिराई. 33 तवय ती बाई तिनासंगे जे काही घडेल व्हतं. तिनी ते वळखं अनी घाबरीसन अनं थरथर कापत त्यानापुढे वनी अनी गुडघा टेकिन त्यानापुढे पडीसन तिनी त्याले घडेल सर्वकाही खरंखरं सांगं. 34 येशु तिले बोलना, "बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे. सुखरूप जाय, तुना आजारपाईन तु मुक्त शे."