38 अनी त्या अधिकारीना घरना जोडे येताच येशुनी हंबरडा फोडीन रडणारासना अनं शोक करणारसना गोंधळ व्हयेल दखा. 39 तो मजार जाईसन त्यासले बोलना, "तुम्हीन कसाले रडतस अनी गोंधळ करतस? पोर मरेल नही, झोपेल शे!"
40 तवय त्यासनी त्यानी थट्टा करी, पण त्यानी त्या सर्वासले बाहेर काढी दिधं अनी पोरना माय बापले अनी आपला तिन शिष्यसले लिसन पोर व्हती त्या खोलीमा गया. 41 मंग त्या पोरना हात धरीसन तो बोलना, "तलिथा कुम" याना अर्थ, "पोरी, मी तुले सांगस ऊठ!"
42 ती बारा वरीसनी पोर लगेच ऊठीसन चालाले लागनी त्या हाई दखीसन चमकाईनात.