21 शेवट एक दिन हेरोदिया हिले तिनी संधी भेटनी, कारण त्या दिन हेरोदना जन्मदिन व्हता. त्यानी सरदार, प्रधान, अनं गालील प्रांतमाधला मोठा लोकसले जेवणनं निमंत्रण दिधं. 22 मंग हेरोदिया हिना पोरनी स्वतः मजार राजवाडामा जाईसन नाचगाणा करीसन हेरोदनासंगे जेवणले बसेल सर्वासले खूश करं, तवय राजा त्या पोरले बोलना, "तुले जे काही पाहिजे ते मनाकडे मांग म्हणजे मी ते तुले दिसु."