पाच हजार लोकसले जेवण
30 त्यानंतर प्रेषित येशुले परत ईसन भेटनात अनं त्यासनी जे काही करेल व्हतं अनी शिकाडेल व्हतं ते सर्वकाही त्यासनी त्याले सांगं. 31 तठे भरपुर लोके ये जा करी राहींतात त्यामुये येशुले अनी त्याना शिष्यसले जेवाले सवड भेटी नही राहींती. तवय तो त्यासले बोलना, "थोडा आराम कराले एकांतमा चला." 32 मंग त्या नावमा बशीन एकांतमा निंघी गयात.
33 तवय लोकसनी त्यासले दखी लिधं बराच जणसनी त्यासले वळखी लिधं अनी तठला गावमधला लोके पायी चालीसन अनं पयत जाईसन येशु अनी त्याना शिष्यसना पहिलेच तठे पोहची गयात. 34 ६:३४ मत्तय ९:३६येशु नावमातीन उतरना तवय त्यानी लोकसनी गर्दी दखी, तवय त्याले त्यासनी किव वनी कारण त्या बिगर मेंढपाळना भटकेल मेंढरंसना मायक व्हई जायेल व्हतात. म्हणीन तो त्यासले बराच गोष्टी शिकाडु लागना. 35 जवय बराच उशीर व्हयना तवय, शिष्य येशुकडे ईसन बोलनात, "हाई एकांतनी जागा शे, अनी बराच उशीर व्हयेल शे. 36 म्हणीन त्यासले जाऊ द्या म्हणजे लोके आसपासना खेडापाडा अनं गावमा जाईसन स्वतःकरता जेवण ईकत लेतीन."
37 पण येशुनी शिष्यसले उत्तर दिधं, "तुम्हीनच त्यासले खावाले द्या," तवय त्या बोलनात, "आम्हीन दोनशे चांदिना शिक्कासण्या६:३७ दोनशे चांदिना शिक्का म्हणजे दोनशे दिननी मजुरी भाकरी ईकत लईसन त्यासले खावाले देऊत का?"
38 येशु त्यासले बोलना, "तुमना जोडे कितल्या भाकरी शेतस? जाईसन दखा," त्या दखीसन बोलनात, "पाच भाकरी अनी दोन मासा शेतस."
39 मंग येशुनी शिष्यसले सांगं अनी त्यासनी सर्व लोकसले हिरवा गवतवर पंगतमा बसाले लायं. 40 तवय त्या शंभर शंभर अनी पन्नास पन्नासन्या पंक्तीसमा बसनात. 41 तवय येशुनी त्या पाच भाकरी अनी दोन मासा लिसन त्यावर स्वर्गकडे दखीसन आशिर्वाद मांगा, अनी भाकरी मोडीसन शिष्यना जोडे त्यासले वाढाले दिध्यात अनी त्यानी त्या दोन मासा बी सर्वासले वाढाले दिधात. 42 मंग सर्व लोकसनी पोटभर जेवण करं. 43 अनी शिष्यसनी उरेल मासान्या अनं भाकरीसना बारा डालक्या भरीन उचल्यात. 44 तठे जेवण खाणारा माणसेच फक्त पाच हजार व्हतात.