37 पण येशुनी शिष्यसले उत्तर दिधं, "तुम्हीनच त्यासले खावाले द्या," तवय त्या बोलनात, "आम्हीन दोनशे चांदिना शिक्कासण्या६:३७ दोनशे चांदिना शिक्का म्हणजे दोनशे दिननी मजुरी भाकरी ईकत लईसन त्यासले खावाले देऊत का?"
38 येशु त्यासले बोलना, "तुमना जोडे कितल्या भाकरी शेतस? जाईसन दखा," त्या दखीसन बोलनात, "पाच भाकरी अनी दोन मासा शेतस."
39 मंग येशुनी शिष्यसले सांगं अनी त्यासनी सर्व लोकसले हिरवा गवतवर पंगतमा बसाले लायं. 40 तवय त्या शंभर शंभर अनी पन्नास पन्नासन्या पंक्तीसमा बसनात. 41 तवय येशुनी त्या पाच भाकरी अनी दोन मासा लिसन त्यावर स्वर्गकडे दखीसन आशिर्वाद मांगा, अनी भाकरी मोडीसन शिष्यना जोडे त्यासले वाढाले दिध्यात अनी त्यानी त्या दोन मासा बी सर्वासले वाढाले दिधात. 42 मंग सर्व लोकसनी पोटभर जेवण करं. 43 अनी शिष्यसनी उरेल मासान्या अनं भाकरीसना बारा डालक्या भरीन उचल्यात.