येशु मुका बहिरा माणुसले बरं करस
31 तवय येशु सोर प्रांतमाईन निंघीसन सिदोनना रस्तावरतीन गालीलना समुद्रकडतीन दकापलीस म्हणजे दहा गावसना शहरले वना. 32 तठे काही लोकसनी येशुकडे एक मुका बहिरा माणुसले आनं अनी तुम्हीन त्यानावर हात ठेवा, अशी त्यासनी त्याले ईनंती करी. 33 तवय येशु त्याले गर्दी माईन बाजुले लई गया त्याना कानमा बोटे टाकात नंतर तो थुंकना अनी त्या थुंकीना त्याना जिभले स्पर्श करा. 34 अनं येशु स्वर्गकडे दखीसन दम लाईन, त्या माणुसले बोलना, "इफ्फाता" म्हणजे "मोकळा व्हय!"
35 तवय त्याना कान मोकळा व्हयना अनं त्यानी जिभनी गाठ मोकळी व्हईन तो स्पष्ट बोलाले लागना. 36 तवय हाई कोणलेच सांगानं नही अस येशुनी त्याले बजाईन सांगं पण त्यानी हाई गोष्ट सर्वासले सांगी दिधी. 37 तवय ज्यासनी ऐकं त्या भलताच चकित व्हईसन बोलनात की, "हाऊ सर्वकाही कितलं चांगलं करी लेस!" अनं "हाऊ बहिरासले ऐकानी अनं मुकासले बोलानी शक्ती देस!"